ऑनलाईन पैसे कमवण्याचे 5 सोपी मार्ग । How Make Money Online in Marathi

तुम्हाला पण पैसे घरी बसून ऑनलाईन पैसे कमवायचे आहे, तुम्हाला इंटरनेट वरून पैसे कसे  कामवाल्या जातात हे जाणून घ्यायचे आहे, तर आजच्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत ऑनलाईन पैसे कमवायचे ५ सोपी मार्ग आपल्या मराठी भाषेमध्ये. Make Money Online in Marathi

मित्रांनो तुम्ही विद्यार्थी आहात,गृहिणी आहात, तुम्ही बेरोजगार आहात किंवा  कोरोना च्या काळात तुमची नोकरी गेली आहे, तर हताश होऊं नका,रिकामे बसू नका ऑनलाईन पद्धतीने काम करून घरी बसून तुम्ही इंटरनेट च्या माध्यमातून पैसे कमवू शकता, हि ऑनलाईन काम तुम्ही पार्ट टाईम किंवा फुल्ल टाईम, जसा वेळ भेटेल तसे  करू शकता. 

आताच्या या काळामध्ये सर्व व्यवसाय ऑनलाईन झाले आहेत, त्यामुळे वर्क फ्रॉम होम हे वाक्य आपल्या नेहमी कानावर पडत असतं, जर आपल्याला आपला परिवार चालवायचा असेल आपली उपजीविका पूर्ण करायची आहे तर तुम्हाला कामही करावंच लागेल , ते ऑनलाईन इंटरनेट च्या माध्यमातून असो किंवा ऑफलाईन पद्धतीने असो, आजच्या काळामध्ये इंटरनेट च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरपूर असे मार्ग उपलब्ध आहेत  ज्यामुळे आपण घरी बसल्या पैसे कमवू शकतो, त्या पैकी ५ सोपी मार्ग तुम्हाला सांगणार आहे.

 

ऑनलाईन पैसे कमवायचे ५ सोपी मार्ग

YouTube वरून पैसे कमवा

YouTube वरून पैसे कमवा

मित्रांनो युट्युब हा जगातील सावंत मोठा विडिओ फ्लॅटफॉर्म आहे, यावर दररोज लाखो विडिओ अपलोड होतात, आणि या YouTube चा वापर आपण दररोज नवनवीन माहिती बघण्यासाठी करत असतो, बातम्या, शैक्षणिक माहिती  असो व मनोरंजन करणारे विडिओ असो, तुम्ही रोज YouTube चा वापर हा करत असता. 

पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही युट्युबर बनून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला युट्युब वर आपले स्वतःचे YouTube चॅनेल बनवावे लागेल, चॅनेल वर विडिओ अपलोड करावे लागतील. सुरुवात तुम्ही आपल्या मोबाईल द्वारे विडिओ करू शकता. या साठी तुम्हाला फक्त एका जीमेल ची आवश्यकता आहे. 

YouTube वर आपले विडिओ लोकांनी बघितल्यानंतर आपल्या विडिओ वर Advertisement येईल, आणि याचे पैसे  तुम्हाला तुमच्या AdSense अकाउंट द्वारे डायरेक्ट बँक अकॉउंट मध्ये येतील.

Instagram वरून पैसे कमवा

Instagram वरून पैसे कमवा

इंस्टाग्राम चा वापर आपण फोटोस, विडिओ आणि रील्स बघण्यासाठी करतो, पण तुम्हाला जाणून आश्चर्य  होईल कि इंस्टाग्राम चा वापर करून आपण लाखो रुपये कमवू शकतो.आणि लोक कमवत सुद्धा आहेत. 

इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्यासाटी तुम्हाला इंस्टाग्राम वरती एक अकाउंट तयार करावे लागेल, आणि फोटोस अपलोड करावे लागेल, सर्वात आधी आपल्या आवडी नुसार एक टॉपिक ठरवून घ्या आणि त्यानुसार फोटोस आणि विडिओ अपलोड करा, जसजसे तुमच्या अकाउंट वरती फोल्लोवेर वाढत जाईल,तसतसे तुम्ही लोकांच्या समोर याल, यामुळे मोठमोठया कंपन्या आणि ब्रॅण्ड्स तुम्हाला त्याची पोस्ट म्हणजे त्याची Advertisement करण्यासाठी संपर्ग करतील. तुम्ही सुद्धा आपले प्रॉडक्ट विकू शकता, स्पॉंसरशीप मिळवू शकता. इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्याचे इत्यादी मार्ग आहेत.

Facebook वरून पैसे कमवा

Facebook वरून पैसे कमवा

मित्रांनो फेसबुक चा वापर आपण फोटोस अपलोड करू शकतो, आपल्या मित्रांची गप्पा मारू शकतो, विडिओ कॉल करू शकतो, आणि सोशल update राहू शकतो, बस आपल्याला एवढाच माहीत आहे, याच्या पालिकांध्ये सुद्धा फेसबुक चा वापर आपण पैसे कमवण्यासाठी  सुद्धा करू शकतो. 

यासाठी आपल्याला फेसबुक वर अकाउंट काढून एक पेज बनवावे लागेल, या पेज  वरून आपल्या आवडी नुसार  एक टॉपिक काढून त्यावर फोटोस आणि विडिओ टाकावे, हळू हळू फेसबुक पेज वर फोल्लोवर आणि लाईक्स वाढत जाईल, १० हजार फोल्लोवर झाल्यानंतर आपल्या पेज वर Ads चालू हॊईल,यातून तुम्हाला पैसे मिळतील, किंवा या पेज च्या द्वारे तुम्ही प्रॉडक्ट ची विक्री करू शकता, स्पॉन्सरशीप मिळवु शकता, व फेसबुक पेज ची विक्री करू शकता, अश्याप्रकारे फेसबुक द्वारे तुम्ही लाखो रुपये कमऊ शकता.

Blogging  वरून पैसे कमवा

Blogging वरून पैसे कमवा

खूप सारे लोक ब्लॉगिंग द्वारे महिन्याला लाखो रुपये कामावत आहेत, तुम्हाला जर लिहायची आवड आहे, तुम्ही एखाद्या टॉपिक वर जर चांगले लिहू शकता तर, ब्लॉगिंग तुमच्या साठीच आहे , यासाठी आपला एक टॉपिक निवडून घ्या आणि त्यावर लिहणे सुरू करा, हा सर्वात सोपा मार्ग आहे ऑनलाईन पैसे कमवायचा.

मित्रानो तुम्ही फ्री ब्लॉगर फ्लॅटफॉर्म किंवा Paid वर्डप्रेस चा वापर करून तुम्ही आपली वेबसाईट व ब्लॉग बनवू शकता. ब्लॉगर वरुन गुगल एड्स द्वारे व Sponsorships द्वारे तुम्ही पैसे कमवू शकता. 

Affiliate मार्केटिंग करून पैसे कमवा

Affiliate मार्केटिंग करून पैसे कमवा

Affiliate मार्केटिंग म्हणजे दुसऱ्याचं प्रॉडक्ट विकून देणं यासाठी तुम्हाला चांगले कमिशन मिळेल,तुम्हाला प्रॉडक्ट ऍमेझॉन फ्लिपकार्ट आणि भरपूर अश्या कंपन्या आहेत जे तुम्हाला देतील. 

प्रॉडक्ट विकण्यासाठी तुम्ही सोशल मीडिया चा वापर करू शकता, फेसबुक , युट्युब , इंस्टाग्राम आणि ब्लॉगिंग या द्वारे तुम्ही प्रॉडक्ट चा Review लिहून विडिओ तयार करून तो प्रॉडक्ट विकू शकता. या सठी  तुम्हाला कोणत्याच भांडवलाची व कूठेंही जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या करू शकता. 

इत्यादी ऑनलाईन पद्धतीने काम करण्याचे सोपी मार्ग मी तुम्हाला सांगितले आहेत, आशा आहे तुम्ही या मार्गांचा वापर करून पैसे कमवाल, तर तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली कंमेंट करून सांगा, व आपल्या मित्रांना शेअर  करा.

Leave a Comment

error: Content is protected !!