नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण बघणार आहोत,फेसबुक वरून पैसे कसे कमवाण्याचे ५ सोपी मार्ग.
मित्रांनो आजकाल सर्वांनाच माहीत आहे फेसबुक काय आहे. तुम्ही पण फेसबुक चा वापर आपले फोटोस आणि व्हिडिओ अपलोड करायला करत असाल. मित्रानो आपला रोजचा अर्धा दिवस तर फोटोस बघणे आणि चॅटिंग मध्ये करण्यात निघून जातो.पण तुम्ही कधी विचार केलाय की आपण फेसबुक च्या माध्यमातून पैसे कमवू शकतो, नाही ना तर तेच मी आजच्या लेखात सांगणार आहे.
फेसबुक काय आहे ?
फेसबुक एक सोशल नेटवर्क आहे याचा वापर करून आपण आपल्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत जोडून राहू शकतो. आपले फोटोस आणि विडिओ अपलोड करू शकतो व गप्पा गोष्टी करु शकतो,व आपला जर व्यवसाय असेल तर आपण आपलं एक फेसबुक पेज तयार करू शकतो आणि आपल्या प्रॉडक्ट ची माहिती देऊ शकतो.
फेसबुक वरून पैसे कमावण्याचे मार्ग
- फेसबुक इन्स्टंट आर्टिकल
- फेसबुक पेज विडिओ मोनिटाइझेशन
- पेड पोस्ट
- स्पॉन्सरशीप
- अफिलिएट मार्केटिंग
फेसबुक पेज कसे तयार करावे ?
मित्रानो सगळ्यात आधी आपल्या फेसबुक अकाउंट ला लॉगिन करा लॉगिन केल्यावर फेसबुक होम पेज ओपन होईल, होम पेज वर साईड ला 3 डॉट वरती क्लिक करा, क्लिक केल्यानंतर भरपूर ऑपशन येतील त्यात पेज च्या ऑपशन ला क्लिक करा,आणि क्रियेट पेज वर क्लिक करा.त्यानंतर गेट स्टारटेट वरती क्लिक करा, आता तुम्हाला तुमच्या पेज साठी एक नाव द्यावं लागेल,नाव दिल्यानंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करा, त्यानंतर पेज च्या बाबतीत काही ऑपशन येतील,त्यात आपल्या पेज ची कॅटेगिरी विचारतील त्यांनतर सब कॅटिगिरी निवडल्या नंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करा, जर तुमच्याजवळ वेबसाईटवर असेल तर टाका नाहीतर स्कीप करा, त्यांनतर तयार झालेल्या फेसबुक पेज ला एक प्रोफाइल फोटो आणि कव्हर फोटो अपलोड करावं लागेल. आशापद्धतीने आपले फेसबुक पेज तयार होईल.