युट्यूब मधून पैसे कमावण्याचे 5 सोपी मार्ग | Earn Money From YouTube in Marathi

मित्रांनो तुम्हाला सुद्धा YouTube वरून पैसे कमवायचे आहे, प्रसिद्धी मिळवायची आहे, तर आजच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला युट्युब वरून पैसे कसे कमवायचे याचे सोपी ५ मार्ग सांगणार आहे, मित्रांनो युट्युब बद्दल तुम्हाला माहीतच आहे,youtube एक विडिओ फ्लॅटफॉर्म या वर दररोज नवनवीन विडिओ अपलोड होत असतात,याचा वापर आपण नवनवीन बातम्या, सिनेमा, मनोरंजन करणारे विडिओ बघत असतो.

मित्रांनो ऑनलाईन पैसे कमवायचे खूप पर्याय उपलब्ध आहे, त्यातलाच हा YouTube एक पर्याय आहे, आणि या YouTube च्या माध्यमातून लोक लाखो रुपये महिना कमवत आहे, तर तुम्ही कसे YouTube च्या माध्यमातून पैसे कमवू शकता याचे सोपी ५ मार्ग मी सांगितले आहे.

युट्यूब काय आहे ? कसं काम करते ?

युट्यूब काय आहे कसं काम करते

मित्रांनो युट्युब एक विडिओ फ्लटफॉर्म आहे,तसेच गुगल नंतर दुसरे सर्वात मोठे व्हिडीओ सर्च इंजिन आहे, युट्युब ची सुरवात २००५ पासून झाली, आणि २००६ साली गुगल ने विकत घेतले, युट्युब चा वापर आपण नवनवीन बातम्या,लाईव्ह कार्यक्रम आणि मनोरंजनात्मक विडिओ बघण्यासाठी करतो. युट्युब वर कोणीही स्वतःचे चॅनेल बनवू शकतो,आणि विडिओ अपलोड सुद्धा करू शकतो, ते अगदी फ्री आहे, युट्युब च्या माध्यमातून अनेक लोक पैसे तर कमावतातच सोबतच आपले टॅलेंट दाखवून इंटरनेट वर प्रसिद्धी सुद्धा मिळवतात.

युट्युब एक विडिओ शेअरिंग फ्लटफॉर्म आहे ,यामुळे लोक जे विडिओ बनवून आपल्या युट्युब चॅनेल वर अपलोड करतील,त्या विडिओ चे युट्युब पैसे आपल्या कन्टेन्ट क्रेयेटर म्हणजे विडिओ तयार करणाऱ्याला देईल. युट्युब ५५% Revenue कन्टेन्ट क्रेयेटर ला व ४५% स्वतः ठेवते.

युट्यूब मधून पैसे कमावण्याचे 5 सोपी मार्ग

गुगल ऍडसेन्स ( Google AdSense )

google AdSense

गुगल  ऍडसेन्स हा युट्युब वरून पैसे कमावण्याचा महत्वाचा मार्ग आहे, मित्रानो तुमच्या युट्युब चॅनेल वरती १ हजार Subscriber आणि ४ हजार तास पूर्ण झाल्यांनतर,तुमचा चॅनेल युट्युब टीम कडे Review साठी जाईल, त्यांनी Approve केल्या नंतर, तुमच्या चॅनेल वर ऍड्स Ads यायला सुरूवात होईल. आणि त्यातून तुम्हाला पैसे मिळतील. या साठी तुम्हाला युट्युब अकाउंट बरोबर एक गुगल ऍडसेन्स अकाउंट सुद्धा तयार करावं लागेल. तुमच्या युट्युब चॅनेल वर जेवढे Views येतील त्या नुसार तुम्हाला पैसे मिळतील. प्रत्येक विडिओ चे टॉपिक नुसार CPM आणि CPC वेगवेगळे असू शकतात. तुमच्या प्रत्येक महिन्याचे पैसे त्याच्या पुढच्या महिन्याच्या १४ तारखेला तुमच्या ऍडसेन्स अकाउंट मध्ये जमा होईल. आणि २१ ते २५ च्या दरम्यान तुमचा बँक अकाउंट मध्ये येईल. जेव्हा तुमच्या ऍडसेन्स अकॉउंट मध्ये १००$ होतील तेव्हाच तुमचं पेमेंट येईल.

स्पॉन्सरशिप ( Sponsorship )

sponsorship

स्पॉन्सरशिप हा युट्युब मधून पैसे कमावण्याचा दुसरा महत्वाचा व सोपी मार्ग आहे, कारण या साठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, कारण कंपनी डायरेक्ट तुमच्याशी संपर्ग साधतील. किंव्हा काही वेळेस तुम्हाला सुद्धा कंपनी ला संपर्ग करावा लागेल. जेव्हा तुमचं चॅनेल चांगले चालेल तेव्हा काही कंपन्या ज्यांना तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांचा कंपनीची जाहिरात करायची असल्यास ते तुम्हाला संपर्ग साधतील. हि जाहिरात करण्यासाठी तुम्ही कंपनी जवळून तुम्हाला हवी ती रक्कम मिळवू शकता. तुमचा व्हिडिओचा टॉपिक आणि कंपनी जर एकाच कॅटीगिरी ची असली तर तुम्हाला जास्त रक्कम मिळू शकते.

अफिलीयेट मार्केटिंग ( Affiliate Marketing )

अफिलीयेट मार्केटिंग ( Affiliate Marketing )

अफिलीयेट मार्केटिंग हा सुद्धा एक सोपी मार्ग आहे, Affiliate Marketing म्हणजे एखाद्या कंपनी सोबत काम करून त्यांची वस्तू किंवा सेवा विकून देणं, यासाठी कंपनी तुम्हाला कमिशन देईल. या मार्गाने तुम्ही कंपनीचे प्रॉडक्ट विकण्याचे काम करत असता. हि मार्केटिंग पूर्णपणे ऑनलाईन असते, या साठी तुम्हाला विडिओ तयार करावा लागेल किंवा त्या वस्तूचे त्या व्हीडीओ मध्ये उल्लेख करावा लागेल, जर लोकांना ती वस्तू आवडली तर ते विकत घेतील आणि तुम्हाला कंमिशन भेटेल. या साठी कंपनी तुम्हाला प्रत्येक वस्तूची वेगवेगळी लिंक देईल, ती लिंक तुम्हाला तुमचा डिस्क्रिपशन मध्ये टाकावं लागेल,लिंक वर क्लिक करून लोक विकत घेतील, जेवढ्या जास्त वस्तू तुम्ही विकाल तेवढी तुम्हाला कंमिशन भेटेल.

Product Selling

Product Selling

मित्रांनो तुम्ही तुमची वस्तु सुद्धा युट्युब च्या माध्यमातून विकू शकता.

Course Selling

Course Selling

तुम्ही एक स्वतःचा कोर्स तयार करून, तो कोर्स युट्युब च्या माध्यमातून तुम्ही विकू शकता, लोकांना त्याची माहिती देऊ शकता. तुम्ही त्याचे डेमो विडिओ युट्युब वर टाकून जाहिरात करू शकता. जर तुमचा कोर्स किंवा पुस्तक लोकांना आवडले तर ते घेतील. उदाहरणार्थ तुम्ही इंग्लिश टीचर आहात, आणि तुम्ही इंग्लिश चा कोर्स बनवला तर तो तुम्ही युट्युब च्या माध्यमातून विकू शकता आणि पैसे कमावू शकता.

मित्रानो हि आहेत युट्युब वरून पैसे कमवण्याची मार्ग, तुम्हाला जर युट्यूब मधून पैसे कमवायचे 5 सोपी मार्ग हि पोस्ट आवडली असेल तर तूम्ही आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.आणि कॉमेंट करून सांगा.

युट्यूब मधून पैसे कमावण्याचे 5 सोपी मार्ग

मित्रांनो युट्युब एक विडिओ फ्लटफॉर्म आहे,तसेच गुगल नंतर दुसरे सर्वात मोठे व्हिडीओ सर्च इंजिन आहे, युट्युब ची सुरवात २००५ पासून झाली, आणि २००६ साली गुगल ने विकत घेतले, युट्युब चा वापर आपण नवनवीन बातम्या,लाईव्ह कार्यक्रम आणि मनोरंजनात्मक विडिओ बघण्यासाठी करतो.
लोक जे विडिओ बनवून आपल्या युट्युब चॅनेल वर अपलोड करतील,त्या विडिओ चे युट्युब पैसे आपल्या कन्टेन्ट क्रेयेटर म्हणजे विडिओ तयार करणाऱ्याला देईल. युट्युब ५५% Revenue कन्टेन्ट क्रेयेटर ला व ४५% स्वतः ठेवते.
1.गुगल ऍडसेन्स ( Google AdSense ) 2.स्पॉन्सरशिप ( Sponsorship ) 3.अफिलीयेट मार्केटिंग ( Affiliate Marketing ) 4.Product Selling 5.Course Selling

Leave a Comment

error: Content is protected !!